क्रूर सासऱ्याने जावयाचा निवारा दिला पेटवून

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- नेवासा तालुक्यातील मुळा कारखाना गट ऑफिसलगत एका सासऱ्याने चक्क आपल्या जावयाची झोपडीच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गाडी यार्ड मधील तोडणी कामगार असलेले अविनाश दादाहरी सावंत मुळा कारखाना गट ऑफिसजवळ मुळा कारखान्याच्या मालकीच्या जागेत झोपडी टाकुन राहत होते. या झोपडीत त्याची आई कलाबाई व वडील दादाहरी असे एकत्र राहत होते.

माझी पत्नी डिलेव्हरीसाठी माहेरी सोनई खरवंडी रोड येथे गेली असता, मी व माझी आई पत्नीस भेटण्यास गेलो असता, मी पत्नीबरोबर बोलत असताना सासरे भिमराव शिंदे, मेव्हणा बालु साहेबराव शिंदे या दोघांनी बायकोला भेटायला आत्ता सुचले का? असे म्हणून मारहाण करुन दमदाटी केली. आम्ही मुळा कारखाना येथिल झोपडीत आलो.

दि. 18 रोजी रात्री जेवण करुन झोपडीबाहेरील मोकळ्या जागेत झोपलो असता. उशिरा रात्री झोपडीला कोणीतरी आग लावून दिली. इतर लोकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. बाजुस शोधाशोध घेत असताना माझे सासरे व मेव्हणा हे दोघे पळताना दिसले.

आम्ही आरडाओरड केली असता, ते मोटारसायकलवर बसून पळुन गेले. शेजारी राहणार्‍या शिवाजी राजाराम शिंदे व इतर उस तोड कामगारांनी आग विझवण्यास प्रयत्न केले.

दरम्यान मुळा करखान्याची अग्नीक्षामक घटनास्थळी दाखल झाली. व आग विझविण्यात आली. याबाबत तोडणी कामगाराच्या अविनाश दादाहरी सावंत यांच्या फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाण्यात सासर्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe