कृषी पंपाचा वीजपुरवठा बंद केल्याने संतप्त शेतकऱ्यांचा वीज उपकेंद्रासमोर ठिय्या!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-अनेक दिवसांनंतर निसर्गाच्या कृपेने चांगला पाऊस पडला असून यावर्षी पिके देखील जोमात आली आहेत.

मात्र शेतकऱ्यांना आलेले हे चांगले दिवस पाहवत नसल्याने वीज कंपनीकडून कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. मात्र शेतकरी देखील आता पेटून उठला असून,

वीज कंपनीच्या या आडमुठ्या भूमिकेविरुद्ध संघर्ष करत आहे. असाच काहीसा प्रकार पारनेर तालुक्यात घडला मात्र शेतकऱ्यांनी थेट वीज उपकेंद्रासमोर ठिय्या दिला. याबाबत सविस्तर माहिती अशी की,

मागील तीन दिवसांपासुन पारनेर तालुक्यातील देसवडे, पोखरी परीसरातील शेतकऱ्यांना कोणतीही पुर्व सुचना न देता या भागातील कृषी पंपाची विज वीज खंडीत करण्यात आली आहे.

ऐन हंगामात वीज नसल्यामुळे हाता तोंडाशी आलेले पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खंडीत केलेला वीजपुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा, म्हणुन या भागातील शेतकरी वीज उपकेंद्रासमोर ठाण मांडुन बसले आहेत.

शेतकऱ्यांना पूर्व सुचना न देता विज खंडीत न करण्याचा शासनाचा आदेश असतानाही अधिकारी मात्र शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यानी केला आहे. या आंदोलनात भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पदाधीकाऱ्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe