सोशल डिस्टन्स न पाळल्याबद्दल दोन मंगल कार्यालयावंर कारवाई ५० हजारांचा दंड वसूल ; या तालुक्यातील प्रकार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने परत एकदा कडक निर्बंध कडक निर्बंध लादले असून याबाबत शासनातर्फे कारवाई करण्यात आली आहे.

पारनेर येथे आज रविवारी पारनेर च्या तहसिलदार ज्योती देवरे व पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासह नगरपंचायत च्या वतीने कारवाई करत, पारनेर येथील दोन मंगल कार्यालय व विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत पन्नास हजारांचा दंड वसूल केला आहे.

पारनेर येथील मनकर्णिका लॉन्स व लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय या ठिकाणी विवाहानिमित्त मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दिसून आल्यानंतर , तहसीलदार ज्योती देवरे व पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांनी मंगल कार्यालयात जाऊन सदरची कारवाई करत मंगल कार्यालयांवर प्रत्येकी वीस हजार रुपयांचा दंड ठोठावला.

तसेच पारनेर येथील बसस्थानक चौकात तसेच आठवडे बाजारात जाऊन विना मास्क करणाऱ्या शंभर जणांवर कारवाई करीत दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

तसेच मंगल कार्यालयाच्या मालकांना व नागरिकांना आवाहन करत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून,

अन्यथा कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे . दरम्यान ही कारवाई करीत असताना लग्न मंडपात नवरा आणि नवरी ने मास्क घातल्याचे आढळून आल्याने त्यांचे अभिनंदन केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe