अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-नगर तालुक्यातील वाळुंज फाटा येथील मोरे वस्तीवर घरघुती वादातून चक्क भावाच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे.
ही घटना शनिवारी रात्री एक वाजता घडली असून संतोष दत्तु मोरे (वय 42 रा. वाळुंज ता. नगर) असे हत्या झालेल्या व्यक्तीच नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि
नगर तालुक्यातील वाळुंज फाटा येथील मोरे वस्तीवर राहाणारा संतोष मोरे हा पत्नी प्रियंकाला घरगुती कारणावरून नेहमी त्रास देत होता. यामुळे त्यांच्यात कायमच वाद होत होते.
शनिवारी रात्री प्रियंकाने आपला भाऊ रामेश्वर दशवंत याला घरी मोरे वस्ती येथे बोलवून घेतले. संतोष व रामेश्वर यांच्यात शनिवारी रात्री वाद झाले. रामेश्वर व प्रियंका यांनी संतोष यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
रामेश्वर याने संतोष यांच्या डोक्यात लोखंडी कुर्हाडीचा तुब्याकडील बाजू मारून जखमी केले. संतोष यांच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
मयत संतोष यांची पत्नी प्रियंका ऊर्फ शारदा संतोष मोरे (रा. मोरे वस्ती वाळुंज ता. नगर) व मेव्हणा रामेश्वर विठ्ठल दशवंत (रा. ताहराबाद ता. राहुरी) यांच्याविरूद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी रामेश्वर दशवंत व प्रियंका मोरे यांना अटक केली आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved