अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत कर्जत तालुक्यातून अंबादास पिसाळ यांनी निसटता विजय मिळवला. पिसाळ यांना 37 मते मिळाली.
तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मिनाक्षी साळुंके यांना 36 मते पडली. अवघ्या 1 मताने विजयी झालेले उमेदवार अंबादास पिसाळ यांनी कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर रविवारी सूचक शब्दात टीका केली.
पवार यांनी निवडणूक हातात घेऊन प्रतिष्ठेची केली होती, असे ते म्हणाले. आपला विजय म्हणजे पवारांचा पराभव, असा त्यांच्या प्रतिक्रियेचा मतितार्थ असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नगरमध्ये जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून आले. 21 पैकी 17 जागा या अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित चार जागांसाठी मतदान होऊ आज मतमोजणी पार पडली.
या चार जागांपैकी भाजपला 2 तर महाविकास आघाडीला दोन जागा मिळाल्या. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले हे मोठ्या फरकाने निवडून आले.
दरम्यान नगर तालुका सेवा सोसायटी मतदार संघातून विजयी झालेले कर्डीले व कर्जत सेवा सोसायटी मतदार संघातून विजयी झालेले पिसाळ एकत्र आले. निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल दोघांनी एकमेकांचा सत्कार केला.
त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. पिसाळ म्हणाले की, माझी निवडणूक अतिशय चुरशीची होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती व स्वतःच्या हातात घेतली होती.
माझ्याकडे मतदार अजिबात नव्हते. मात्र, माझी इच्छाशक्ती होती, विजयी होईल अशी खात्री होती. त्यामुळे आमच्या गावचे ग्रामदैवत सदगुरु गोदड महाराज यांच्या कृपेने मी अवघ्या एक मताने निवडून आलो.
याआधी समान मते पडल्याने चिट्ठीवर मी पराभूत झालो होतो. त्यानंतर एका निवडणुकीत 4-5 मतांनी मी निवडून आलो. ही माझी संचालक होण्याची चौथी निवडणूक आहे व आता ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved