अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-मुळा नदीत अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणातून पहिले आवर्तन शनिवारी सोडण्यात आले आहे. मुळा नदीत पात्रात 600 क्यूसेकने पाणी नदीपात्रात झेपावले.
दि. 5 फेबुवारी ला कोतुळ येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्या प्रमाणे मुळा नदीत धरणाचे पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे.
जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता संगिता जगताप, उपविभागिय अभियंता संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता नानासाहेब खर्डे, चेतन शहापुरे यांनी धरणाचे चाक फिरवून नदी पात्रात पाणी सोडले.
धरणातून आवर्तन सोडते वेळी धरणात 550 दशलक्ष घनफुट पाणी शिल्लक होते. या आवर्तनात 200 ते 300 दशलक्ष घनफुट पाणी खर्च होणार आहे.
संगमनेर तालुक्यातील आभाळवाडी को. प. बंधार्यापर्यंत हे पाणी जाणार असून लाभ क्षेत्रात मुळा नदीपात्रातील बंधारे भरून घेतले जाणार आहे. त्यानंतर आवर्तन बंद करण्यात येईल. 10 ते 12 दिवस हे आवर्तन सूरु राहील असा अंदाज आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved