अंगावर कार घालून प्रोफेसरला जीवे मारण्याचा प्रयत्न

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-पत्नीच्या बढतीच्या कारणावरून बेसबॉलच्या बॅटने डोक्यावर डाव्यापायावर जबर मारहाण करून प्रोफेसरला आत तूला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवून अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

ही घटना वडगाव गुप्ता येथील डेंटल कॉलेजच्या पार्किंगमध्ये घडली. याप्रकरणी डॉ.दिनेश विजय राजपूत यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी अतुल प्रविण पाटीदार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर असे की, येथील वडगाव गुप्ता येथील डेंटल कॉलेजचे प्रोफेसर डॉ.दिनेश विजय राजपूत यांना अतुल प्रविण पाटीदार रा.शिरसाठ मळा साईिदप नगर सावेडी याने त्याच्या पत्नीच्या बढतीच्या कारणावरून राजपुत यांच्या एसयुव्ही कार क्रं.एमएच २०ईजे १५०७ या कारच्या पुढील काचेवर मारून गाडीचे नुकसान केले.

तसेच डोक्यात तसेच पायाच्या डाव्या गुडघ्यावर मारून जबर जखमी केले. तसेच आता तूला जिवंत सोडणार नाही अशी हिंदीत दमबाजी करत फोर्ड कंपनीची कार अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रत्न केला.

याप्रकरणी डॉ.दिनेश विजय राजपूत यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी अतुल प्रविण पाटीदार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या बाबत अधिक तपास सपोनि आठरे हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News