अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-श्रीगोंदा तालुक्यातील कौठा, गार गावच्या शिवारातील भीमानदीपात्रातील वाळूतस्करंवर पोलिसांनी कारवाई केली.
या दरम्यान पोलिसांच्या छाप्याची माहिती मिळताच सर्व वाळूतस्कर बेपत्ता झाले. पोलिसांनी सुमारे १८ लाखांच्या यांत्रिक बोटी ताब्यात घेतल्या असून, अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील दोघंावर गुन्हा दाखल केला आहे.
दोघेही आरोपी पसार झाले आहेत. याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील कौठा,गार गावच्या शिवेवरील भीमानदीपात्रात काहीजण यांत्रिक बोटींच्या सहाय्याने वाळूउपसा करत असल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना मळाली होती.
त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या भागात छापा टाकला असता त्यांना कौठा,गार गावच्या शिवेवरील भीमानदीपात्रात काहीजण यांत्रिक बोटींच्या सहाय्याने वाळूउपसा करत असल्याचे निदर्शनास आले.
मात्र पोलिस आल्याची त्यांना चाहूल लागताच ते यांत्रिक बोटी येथेच सोडून पळून गेले. पोलिसांनी १८ लाखांच्या यांत्रिक फायबर बोटी जप्त केल्या असून,
याप्रकरणी राजेश नंदू मोरे (रा.सहासनगर,इंदापूर रस्ता बारामती, हल्ली रा.दौंड) नितीन वाघ (पूर्ण नाव माहित नाही, रा. दौंड,जि.पुणे) हे दोघेही पसार झालेले आहेत.या दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणाचा अधिक तपास मपोहे कुरूळे हे करत आहेत.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved