पीएम किसान योजनेत नगर जिल्ह्यास राष्ट्रीय पुरस्कार! बुधवारी दिल्ली येथे होणार गौरव

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नगर जिल्ह्यास भौतिक तपासणी या संवर्गात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात बुधवारी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. नवी दिल्लीतील ऐ.पी.शिंदे सभागृहात पुरस्कार वितरण समारोह संपन्न होणार आहे.

जिल्ह्याचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना निमंत्रित केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, सन २०१९ पासून तिची अंमलबजावणी सुरु झाली.

केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार विहित कालावधीत पीएम किसान सन्मान योजनेची कार्यवाही तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी,

नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांच्या दिशानिर्देशात सुरुवातीच्या काळात झाली. कुळ कायदा शाखेचे तत्कालीन तहसीलदार फसियुद्दीन शेख,

शरद घोरपडे यांच्या नियोजनात पीएम किसान योजनेच्या अंमलबजावणीसाठी महसूल व कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या समन्वयाची पायाभरणी झाली.

तसेच जिल्ह्यातील ग्रामस्तरीय समितींच्या सदस्यांना असणाऱ्या शंकाकुशंकांचे निरसन होण्याच्या अनुषंगाने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

नंतरच्या काळात विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांच्या निर्देशात पीएम किसानचे काम पथदर्शी पध्द्तीने सुरु राहिले. कुळकायदा शाखेच्या तहसीलदार सुनिता जऱ्हाड, नायब तहसीलदार वरदा सोमण,

अव्वल कारकून संदेश दिवटे, आयटी असिस्टंट रोहित शिंदे यांच्यासह महसूल अधिकाऱ्यांच्या टीम वर्क मुळे या योजनेत नगर जिल्ह्याचे काम राज्यात नव्हे तर देशात अव्वल राहिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News