कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ गावचा आठवडे बाजार बंद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून जेऊर गावचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घेण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर तालुक्यातील जेऊर गावामध्ये दर शनिवारी आठवडे बाजार भरत असतो.

जेऊर परिसरातील जवळपास आठ ते दहा गावांनी आठवडे बाजार भरत नसल्याने त्यांना एकमेव जेऊर हाच आठवडे बाजार असतो.

त्यामुळे जेऊरला बाजारच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने

आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवार दि. २३ रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घेण्यात आला.

जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या १६ गावांमध्ये आज पर्यंत ३९० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

चालू आठवड्यात नव्याने ७ रूग्ण आढळुन आले. त्यामुळे जेऊर गावचा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नूतन ग्रामपंचायत सदस्यांची पहिलीच मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये कोरोना बाबतचे सर्व नियम पाळून

विविध ग्रामहिताचे निर्णय घेण्यात आल्याने ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे अभिनंदन केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe