पारनेर :- तालुक्यातील सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास पारनेर विधानसभेची जागा आपण नक्की जिंकू, असा शब्द मी आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याला देतो,’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
पक्षाची निर्धार परिवर्तनाचा संवाद यात्रा गुरुवारी (३१ जानेवारी) पारनेरला आली होती. त्या वेळी झालेल्या जाहीर सभेत पाटील बोलत होते.शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
विधान परिषदेतील विरोध पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री दिलीप वळसे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आदी या वेळी उपस्थित होते. लंके यांनी या सभेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सभेत नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.