शरद पवार म्हणतात तरी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार…

Ahmednagarlive24
Published:

मुंबईः विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने पक्षाला भरभरून मतदान दिलं. पण ‘२२० के पार’ चा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा दावा फोल ठरलाय.

सत्तेचा गैरवापर आणि काहीही बोलायचं हे जनतेला पटलेलं नाही. जनतेनं सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीचा सन्मान आम्ही कायम ठेवू, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार. जनतेनं विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलाय, असंही ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment