पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण करण्याची मागणी !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-राज्यात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गाजत असतानाच आणखी एका शहराच्या नामांतराची मागणी करण्यात आली आहे.

नगर जिल्ह्याला ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ असे नामांतर करावे, अशी मागणी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिले आहे.

मध्यंतरी शिवसेनेनेही अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी केली होती. शिवसेनेचे नगर दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी मुख्यमंत्र्यांना व नगर विकास मंत्रालयाला पत्र लिहिले होते.

मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या पत्रात काय म्हंटले? महान व प्रेरणादायी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मस्थान अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी संपूर्ण भारताला नवी दिशा दिली.

देशाला अखंडित ठेवले. त्यांच्या महान स्मृतींपुढे नतमस्तक होऊन, अहिल्यादेवींवर निष्ठा असणाऱ्यांच्या लोकभावनेचा सन्मान ठेवत, ‘अहमदनगर’ जिल्ह्याचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ असे तातडीने नामांतर करावे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी होळकर घराण्याच्या वंशजांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. वाफगावच्या जागेवरून हा वाद निर्माण झाला होता.

त्यानंतर लगेचच अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुढे आल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात अहमदनगरच्या नामांतराचा वाद पेटण्याची शक्यताही जाणकार व्यक्त करत आहेत.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News