अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- अनेक राजकीय , सामाजिक प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधकांना आपले मत व्यक्त करण्यासाठी लाईव्ह टीव्ही शो ला बोलविले जात असते.
दरम्यान अशाच एका शो दरम्यान दोन राजकीय नेते मंडळींमध्ये चर्चा दरम्यान बाचाबाची झाले व याचे रूपांतर थेट चप्पल फेकून मारण्यापर्यंत झाले. दरम्यान ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशात एका लाईव्ह कार्यक्रमात घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणाची सविस्तर माहिती अशी कि, आंध्र प्रदेशसाठी जगन सरकारने तीन राजधान्यांचा प्रस्ताव मांडल्यानंतर अमरावती मध्ये काम बंद करण्यात आले आहे. राजधानीसाठी जवळपास गेल्या ४३४ दिवसांपासून शेतकरी आणि महिला निदर्शने करीत आहेत.
याच विषयावर एका चॅनलवर लाईव्ह चर्चा सुरू होती. या कार्यक्रमात अमरावती विभाग समिती संयुक्त कृती समिती अध्यक्ष डॉक्टर कोलिकापुडी श्रीनिवास राव, भाजपचे राज्य महासचिव विष्णुवर्धन रेड्डी आणि इतर सहभागी झाले होते.
या दरम्यान विष्णुवर्धन रेड्डी आणि श्रीनिवास राव या दोघांतील चर्चेचे वादात रूपांतर झाले. भाजपच्या विष्णुवर्धन रेड्डी यांनी श्रीनिवासराव यांच्यावर टीडीपी सोबत संबंधांचा आरोप केला, तसेच राव यांची थट्टाही केली.
यामुळे श्रीनिवासराव संतापले आणि रागाच्या भरात त्यांनी लाईव्ह कार्यक्रमातच भाजपचे नेते रेड्डी यांच्यावर आपली चप्पल भिरकावली. या अनपेक्षित घटनेमुळे लाईव्ह कार्यक्रमात अँकरला तातडीने ब्रेक घ्यावा लागला.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या इतरांनाही या घटनेमुळे धक्का बसला. भाजप नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|