वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे बळीराजा हैराण

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  राज्यात सध्या ग्राहकांना वाढीव विजबिले आणि वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे मनस्तापाला सामोरे जाव लागत आहे.

नगर जिल्ह्यातही असाच काहीसा प्रकार सुरु आहे. एका शेतकऱ्याला चक्क 81 हजाराचे बिल महावितरणने पाठविले आहे. विज वितरण कंपनीने सध्या शेतीचे विजबील थकीत असल्याचे सांगत विज खंडीत करण्यास सुरुवात केली आहे.

एव्हढ्यावरच न थांबता संपूर्ण डिपीचीच जोडणी बंद करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी आणखीनच वैतागले आहेत. असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यात देखील सुरु आहे, यामुळे नागरिक देखील चांगलेच वैतागले आहे.

नुकतेच नगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कडबाकुट्टी मशीनसाठी चक्क 81 हजार रुपये बिल आले आहे. महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी आणि घरगुती ग्राहक सध्या त्रस्त झाले आहेत.

वीजग्राहकांना चुकीचे रीडिंग, वाढीव स्वरुपात विजेची बिले यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील रामनाथ इंगळे ह्या शेतकऱ्याने कडबाकुट्टी मशीनसाठी एक एचपी विजेची जोडणी शासन योजनेअंतर्गत घेतली.

सुरुवातीला नियमित बील दिले गेले. मात्र, त्यानंतर विजेचा भार हा 1 एचपीवरून थेट 7 एचपीपर्यंत परस्पर विद्युत मंडळाने वाढवत टाळेबंदीच्या काळानंतर तब्बल 81 हजाराचे बिल दिले.

इतके भले मोठे बील येऊनही महावितरणकडून उडवा-उडवीची उत्तरेच मिळत असल्याचे रामनाथ इंगळे यांनी सांगितले. दरम्यान 2003 च्या विज कायद्यानुसार शेतकऱ्यांना थकबाकी असेल तर शेतकऱ्यांना पंधरा दिवस आधी नोटीस देणे बंधनकारक असते.

मात्र, तसे न करता विज जोडणी तोडली जात असल्याचे शेतकरी सांगतात. शेतकरी सध्या विज वितरण कंपनीच्या कारभाराला कंटाळले असून या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन आणि न्यायालयात जाण्याच्या पावित्र्यात आहेत.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe