अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात एका अकरावीच्या विद्यार्थ्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना आज सकाळी समोर आली आहे.
मिरी रस्त्यावरील आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविदयालयात अकरावी काँमर्समध्ये शिक्षण घेणा-या आदेश विजय म्हस्के ( वय-१८) राहणार पवार वस्ती, शेवगाव या विदयार्थ्याने वर्गामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली.
आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारा आदेश हा विद्यार्थी गुरुवारी शाळेतुन घरी गेल्यानंतर दुपारी मी दोन तीन दिवस शाळेत येणार नाही अशी शिक्षकाची परवानगी घेऊन येतो, असे आईस सांगुन घरातुन बाहेर आला होता.
त्यानंतर तो लवकर घरी परत आला नसल्याने आई लक्ष्मीबाई पवार हिने त्याचा शोध घेतला व रात्री ११ वा.शेवगाव पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य करमसिंग वसावे यांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मयत विद्यार्थ्याच्या नातेवाईका समक्ष पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविदयालयामध्ये दुस-या मजल्यावर दोन वर्ग असून एक बंद तर एका वर्गात ११ वीचा वर्ग भरतो. आज गुरुवार ता.२५ रोजी सकाळी आठ वाजता महाविदयालयात नेहमीप्रमाणे विदयार्थी वर्गात आले.
काही विदयार्थ्यांना शेजारच्या बंद वर्गात कोणी तरी स्कार्पच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. प्राचार्य, उपप्राचार्य व इतर शिक्षकांनी खात्री करुन पोलीसांना माहिती दिली.
त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पो.ना. अभिषेक बाबर, रामहरी खेडकर हे घटनास्थळी दाखल झाले. विदयार्थ्यांच्या व नातेवाईकांच्या समक्ष पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामिण रुग्णालयात पाठवला.
त्याच्या मागे आई व तीन बहिणी आहेत. याबाबत मयताचा चुलत भाऊ संतोष बाबासाहेब म्हस्के यांनी पोलिसांत आत्महत्येची तक्रार दाखल केली असुन आत्महत्या कशामुळे केली याचा पोलिस तपास करीत आहेत.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|