आजित पवारांच्या सभेत चोरी झाले होते ‘त्या शेतकऱ्याचे’ पाकिट, आता फोनपे वरुन ३३ हजारांचा गंडा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या जोरावर आज अवघे जग केवळ एका क्लिकवर आले आहे.

आपण घरबसल्या मोबाईल ॲपच्या सहाय्याने खरेदीसह तुमच्या बँकेतील देवाणेवाणीचे व्यवहार देखील या ॲप्सच्या माध्यमातून केले जात आहेत. मात्र अनेक वेळा या खाजगी ॲप्सचा वापर धोकादायक ठरत आहे.

आपली एक छोटीशी चूक देखील आपल्याला रस्त्यावर आणू शकते.एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे खूप आहेत मात्र त्याचसोबत त्यांचे तोटेदेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दिवसेंदिवस सायबर हॅकर्सच्या जाळ्यात अडकणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

असाच प्रकार राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथील शेतकरी नामदेव ठकसेन दोंडया शेतकऱ्यास फोन पे ॲप वरून सुमारे ३३ हजारांचा गंडा घातला असून,याबाबत सायबर क्राईम विभागात तक्रार दिली आहे.

त्यामुळे अनेकजण मोबाईल अँप वापरण्याबाबत विचार करत आहेत. याबाबत सविस्तर असे की, मागील महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राहुरीच्या दौऱ्यावर आले असता त्याच्या सभेस दोंड हे देखील हजर होते.

या सभे दरम्यान त्यांचे पाकीट लांबवले होते. या पाकीटात तीन हजार रुपये रोख रक्कम व महाराष्ट्र बँकेचे एटीएम कार्ड होते. कार्ड चोरल्याने त्यांनी बँकेकडून नवीन एटीएम कार्ड घेतले. परंतु, नवीन एटीएम कार्ड फोन-पे ॲपला चालत नव्हते.

त्यांनी हे ॲप परत एकदा डाऊनलोड केले मात्र कार्ड चालले नाही. त्यामुळे त्यांनी या ॲपच्या कस्टमर केअरच्या नंबरवर संपर्क साधला. थोड्या वेळाने त्यांना त्याच नंबरवरून फोन आला. दोंड यांनी कस्टमर केअरचा फोन समजून,

त्यांनी समोरच्याने सांगितलेल्या सूचनांचे पालन केले. क्षणार्धात त्यांना त्यांच्या खात्यावरून ३३ हजार रुपये वर्ग झाल्याचा मेसेज आला.हा मेसेज वाचून त्यांना आपल्यासोबत काय झाले आहे याची कल्पना आली.याबाबत सायबर क्राईमला जात तक्रार दिली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe