अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-लॉकडाऊन नंतर राज्यासह देशभरातील सर्वच कांदा मार्केटमध्ये कांद्याचे दर प्रचंड वेगाने वाढून ते ८ हजारांच्यावर गेले होते.
त्यानंतर हेच दर ४ ते पाच हजारांवर स्थिरावले होते. परंतु सध्या कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गुरूवारी येथील नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीत एक नंबर कांद्याला अवघा २७०० ते ३३०० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे.
सलग दुष्काळ नंतर अतिवृष्टी व त्यापाठोपाठ कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन या सर्व एकापाठोपाठ आलेल्या संकटात शेतकरी पुरता भुईसपाट झाला होता.
मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व व्यवहार ठप्प असल्याने नंतरच्या काळात शेतमालास चांगले दर मिळत होते.
या दरम्यान देशभरात कांद्याचे दर चांगलेच वाढले होते. अनेक बाजार समितीत कांद्याला ठोक ८० ते ८५ रूपये प्रतिकिलो एवढा विक्रमी दर मिळत होते,
मात्र किरकोळ बाजारात तोच कांदा १०० व त्याही पुढे अधिक दराने विकला जात होता. त्यामुळे कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने परदेशातून कांदा आयात केला होता.
सध्या बाजारात कांद्याची आवक तशी कमीच आहे, मात्र दर दिवसेंदिवस कमी होत आहेत. गुरूवारी झालेल्या लिलावात एक नंबरच्या कांद्याला २७०० ते ३३०० रूपये,
दोन नंबरच्या कांद्याला १९०० ते २७०० तिन नंबरच्या कांद्याला ९०० ते १९००व शेवटी चिंगळी कांद्याला ५०० ते ९०० रूपये असे दर मिळाले.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|