अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीत मुख्य विश्वस्त माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या आश्रयाखाली करोडो रुपयांचा गैरव्यवहार या बातमीत माझ्या बोलण्यात अताएसोच्या मुलींच्या वसतिगृहात संस्थेकडून एक कोटी रुपयाचे नुकसान करण्यात आले असल्याबद्दल प्रसिद्ध होण्याऐवजी भ्रष्टाचार करण्यात आल्याचे प्रसिद्ध झाले.
कारण या प्रकरणात अकोले महाविद्यालयातील मुलींचे वसतिगृह बांधकामासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून एक कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर त्यापैकी ३० लाख रुपये मंजूर झाले.
अताए सोसायटी आर्थिक अडचणीत असल्याने ते पैसे मी संस्थेच्या मागणीनुसार संस्थेकडे वर्ग केले. मात्र, त्यानंतर मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्यात न आल्याने पुन्हा यूजीसीने माघारी बोलावले.
संस्थेकडून ३० लाख व त्यावर १९ लाख व्याज असे यूजीसीला पाठवावे लागले. यामुळेच संस्थेने १०० मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण केले असते, तर आजपर्यंत त्याचा लाभ शेकडो विद्यार्थ्यांना मिळाला असता.
यामुळेच संस्थेकडून याबाबतीत एक कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा माझा आरोप आहे व त्यावर मी आजही कायम राहील, अशी माहिती अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य रमेशचंद्र खांडगे यांनी दिली.
अताए सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे पाटील यांनीही मुलींच्या वसतिगृहात एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप फेटाळून लावत मुलींच्या वसतिगृहासाठी यूजीसीने मंजूर केलेल्या एक कोटी रुपयांच्या नुकसानीस महाविद्यालयातील तत्कालीन प्राचार्य रमेशचंद्र खांडगे हेच जबाबदार असल्याचे म्हटले.
अगस्ती महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य रमेशचंद्र खांडगे यांनी अताएसोच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेत अनेक गैरकारभारावर बोट ठेवले.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|