अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-भरधाव पिकअपने पादचाऱ्याला उडवले. ही घटना कोपरगाव तालुक्यातील रवंदे रस्त्यावर सोमवारी संध्याकाळी घडली.
पिकअप चालकाविरुद्ध मंगळवारी उशिरा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी बाबासाहेब आदमाने (४२ वर्षे, मळेगाव थडी) यांचे वडील फक्कडराव आदमाने (६५ वर्षे) हे पायी जात असताना मागून आलेल्या पिकअपची (एमएच १५ एफ व्ही ८९०८) त्यांना धडक बसली.
ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून
पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल प्रदीप काशीद करत आहेत.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|