डॉ.प्रकाश आमटे यांना कोरोनाची बाधा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-देशसह राज्यभरात कोरोनाने परत एकदा थैमान घातले असून, दिवसागणिक कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत.

त्यात अनेक राजकिय नेते मंडळी, प्रशासनातील अधिकारी, विद्यार्थी, पोलिस व आता समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून,

गुरूवारी सायंकाळी नागपूर येथील एका खासगी रूग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून,त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनलॉक नंतर राज्यातील सर्वच व्यवहार सुरळीत झाले,

मात्र या गडबडीत आपण कोरोनाला विसरलो अन् तिथच आपला घात झाला. आमटे यांना मागील काही दिवसांपासून ताप व खोकला होता. बुधवारी त्यांची कोरोना टेस्ट केली असता ती निगेटीव्ह आली.

त्या नंतर त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. परंतु हे उपचार घेतल्यानंतर देखील त्यांच्या प्रकृतीत फरक पडला नव्हता तसेच ताप व खोकला देखील कमी होत नव्हता. म्हणून चंद्रपूर येथे परत एकदा तपासणी केली असता कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

यावेळी त्यांचे सीटी स्कॅन तसेच रक्ताच्या तपासण्या केल्या असता यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान डॉ.प्रकाश आमटे यांच्या संपर्कातील सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन प्रकाश आमटे यांनी केले आहे.

कोरोनाने राज्यात परत हातपाय पसरल्याने हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पासह आनंदवन तसेच सोमनाथ प्रकल्प पर्यटकांसाठी पुढील काही महिने बंद ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe