शेवगाव :- गेल्या तीन दिवसांपासून अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयकासाठी राळेगणसिद्धी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे त्याच्या पाठिंब्यासाठी शेवगाव येथील कार्यकर्त्यांनीही शेवगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केल आहे.
गेली अनेक वर्ष सरकारने अण्णा हजारे यांना अनेक वेळा आश्वासन देऊनही जनलोकपाल लागू केले नाही त्यामुळे अण्णा हजारे यांनी गेल्या तीन दिवसापासून राळेगणसिद्धी येथे अमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या समर्थनार्थ शेवगाव येथील अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते आशोक ढाकणे यांनी शेवगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
जनलोकपाल विधेयक ताबडतोब लागू करावे तसेच शेवगाव तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मागण्यांचे तात्काळ निवारण करावे आदी मागण्या साठी आशोक ढाकणे व त्यांचे सहकारी शेवगाव तहसील कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसापासून अमरण उपोषण करत आहेत.
अशोक ढाकणे यांच्या आंदोलनाकडे कोणीही वरिष्ठ अधिकारी अद्याप पर्यंत फिरकलेला नाही यावरून प्रशासन अण्णा हजारे व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत किती असंवेदनशील आहे हे यावरून स्पष्ट होत आहे तरी सरकारच्या विरोधात यावरून एक मोठा आक्रोश तयार होताना दिसत आहे.
या आंदोलनांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना व आदी सामाजिक संघटनांनी या वेळी पाठिंबा दर्शविला आहे, उपोषणस्थळी आशोक ढाकणे,बाळू जायभाये,अमोल पेटारे,तापडिया महाराज,नारायण बटुळे,गोरक्षनाथ शेलार,शकुंतला तुजारे,जयश्री ससाणे,संजय नागरे,दत्तात्रेय फुंदे,मधुकर पाटेकर,आदी मान्यवर उपस्थित होते.