अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे एका शेतकऱ्याने आपल्या शेतात अफू पिकवली. पण पोलिसांना याचा सुगावा लागलाच. पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी छापा मारून एक लाख ७० हजार रुपयांची अफूची झाडे जप्त केली.
शेतात अफूची लागवड केली असून ती मोठी झाली आहे अशी गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली त्यावरून त्यांनी पथकासह छापा टाकला व १ लाख ७० हजार रुपयांची अफूची झाडे पोलीसांनी जप्त केले व आरोपी विरूद्ध अमली औषधे द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम १५ क प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
काळेच्या शेतातून ५६ किलो वजनाची झाडे जप्त करण्यात आली. बोंडे आल्याच्या अवस्थेत हे पीक होते. त्याची किंमत सुमारे एक लाख ७० हजार रुपये होते. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ती जप्त केली. अफूच्या लागवडीवर बंदी आहे.
तरीही काळे याने वस्तीच्या जवळच बेकायदेशीरपणे अफूची शेती केल्याचे आढळून आले, त्याच्याविरूद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतात पिकविलेली ही अफू तो कोठे विकणार होता? शेतकरी स्वत: हे पीक घेतात की, त्यांना यासाठी कोणी प्रोत्साहन देऊन हा व्यवसाय करत आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|