अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू आहे.
या प्रकरणातील विविध फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतरही अद्याप कोणावर कारवाई करण्यात आलेली नाही.
मात्र आता पूजाचं अख्खं कुटुंबच महाराष्ट्रासमोर आलं असून त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे.
आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू, असंही पूजाची आई मंडूबाई चव्हाण म्हणाल्या आहेत.
‘माझ्या पोटचा गोळा गेला…माझी मुलगी कशी होती हे मला माहीत आहे…ती धाडसी होती…मात्र तिची आता बदनामी थांबवा…पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतील,
‘ असं म्हणत पूजा चव्हाण हिच्या आईनं म्हंटले आहे. दरम्यान, पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात थेट शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचं नाव आलं आहे.
कारण राठोड आणि पूजा चव्हाण यांच्यात फोनवर झालेल्या कथित संभाषणाच्या ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत.
तसंच दोघांचे एकत्रित फोटोही समोर आले आहेत. माझ्या मुलीचा मृत्यू झालाय, तिची बदनामी करू नये, माझी मुलगी कशी होती मला माहीत आहे.
ती खूप टेन्शनमध्ये होती, तिने आत्महत्या का केली याबद्दल काहीच माहीत नाही, असंही मंडूबाई चव्हाण म्हणाल्यात.
माझी बहीण वाघीण होती, ती आत्महत्या करणाऱ्यांपैकी नाही. ती प्रीतम मुंडे आणि पंकजाताई मुंडेंसोबतही फिरलेली आहे.
माझी बहीण कार्यकर्ती होती हे अख्ख्या बीडला माहीत आहे, तिचं कोणासोबत नाव जोडणं योग्य नाही, असंही पूजा चव्हाणची बहीण म्हणाली आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|