अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेची सभा कशी घेण्यात यावी या मुद्द्यावरून चर्चा रंगल्या असतानाच आज झेडपीमध्ये एका मुद्द्यावरून चांगलाच गोंधळ माजला होता.
आई वडीलांचा संभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कपातीवरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आज शाब्दिक युद्ध रंगले.
यावेळी राजेश परजणे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. या विषयावर सीईओ राजेंद्र क्षीरसागर यांनी उत्तर दिले.
प्रत्येकाने आपल्या आई वडीलांचा संभाळ करावा तसेच मुलीनीही निधार पालकांचा संभाळ करावा.
असे त्यांनी म्हंटले, अशा तक्रारी झेडपीकडे आल्यास योग्य प्राधिकरणाकडे पाठवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू,
असे क्षीरसागर यांनी म्हंटले आहे. तसेच, शिक्षक बँकेची वसुली थांबवण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|