विजयानंतर रोहित पवार राम शिंदेंच्या घरी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार व पालकमंत्री राम शिंदे यांच्यात झालेल्या लढतीत अखेर रोहित पवारांचा विजय झाला आहे.

पालकमंत्री शिंदे यांचा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी तब्बल 42 हजार मतांनी पराभव केला. 

पालकमंत्री राम शिंदे यांना पराभवाची धूळ चारणारे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी आज सायंकाळी चौंडी येथे येऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे दर्शन घेतले.

त्यानंतर पालकमंत्री राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी फेटा बांधून पवार यांचा सत्कार केला

रोहित पवार यांनी राजकीय परिपक्वता दाखवत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या घरी जाण्याचा बेत आखला. त्यांनी चौंडीत जाऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे दर्शन घेतले.

त्यावेळी त्यांच्यासोबत काही निवडक कार्यकर्ते होते. तेथून पवार हे पालकमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी गेले. तिथे पालकमंत्री शिंदे यांच्या आईचे दर्शन घेतले.

त्यानंतर शिंदे यांनी पवार यांचे अभिनंदन करीत फेटा बांधून त्यांचा सत्कार केला. रोहित पवार हे शिंदे यांच्या घरी येताच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment