अहमदनगर ब्रेकिंग : दुध टँकर चालकाचा अपघातात मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-   नगर‌-दौड रोडवर लोणीव्यंकनाथ बसस्थानकासमोर उस घेवून जाणारा टॅक्टरव दुधाचा टँकर यांची धडक होऊन झालेल्या अपघातात टँकर चालक ठार झाला आहे.

बाळासाहेब बबनराव यादव (वय ६०, रा.तांदुळवाडी, ता.बारामती) असे अपघातात ठार झालेल्या टँकर चालकाचे नाव असून हा अपघात शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

दुधाचा टँकर बारामतीवरून नाशीकला दूध भरण्यासाठी जात होता. यावेळी नागवडे साखर कारखान्याकडे जाणा-या उसाच्या टेलरची व टँकरची समोरासमोर धडक झाली.

यात टँकर चालक बाळासाहेब यादव हे गंभीर जखमी झाले. त्यांना लोणीव्यंकनाथ युवकांनी तातडीने दवाखान्यात पाठविले. परंतु ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना बारामती येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी त्यांचे निधन झाले आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe