मुलाला सोडवायला गेली अन स्वतःच तुरूंगात जाऊन बसली!

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- पुत्र प्रेमापोटी हिरकणी या मातेने चक्क रात्रीच्या वेळी अवघड डोंगर उतरल्याचे आपण ऐकले आहे. असाच काहीसा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे. तो असा पोलिसांनी पकडलेल्या आपल्या मुलाला सोडविण्यासाठी गेलेल्या आईने पोलीस ठाण्यातच गोंधळ घातला.

यामुळे त्या मुलाला सोडणे तर दूरच राहिले मात्र पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी त्या आई विरुध्दही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे घडली.

याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगव्हाण येथे चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून पाच जुगाऱ्याना ताब्यात घेतले होते.

या आरोपींपैकी संतोष सुदाम मगर याची आई बेबी सुदाम मगर यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात येऊन आरडाओरडा करून मोबाईलवर गोपनीय माहितीचे चित्रीकरण केले. पोलीस निरक्षक संपतराव शिंदे यांच्या कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे जुगार खेळताना सापडलेल्या मुलावर पुत्रप्रेम दाखवायला गेलेल्या आई विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe