परत लॉकडाउन परवडणारे नाही ; म्हणून काळजी घ्या!

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- कोरोनाचा संसर्ग वाढू नये. यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात केलेल्या सर्व प्रकारच्या उपाययोजना व नागरिकांच्या सहकार्यामुळे आपण कोरोनावर नियंत्रण मिळविले. त्यामुळे राज्यात, जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती.

मात्र मागील काही दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. कोरोना बाधित रुग्णांची वाढणारी संख्या हा चिंतेचा विषय असून नागरिकांनी निष्काळजीपणा टाळून, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.

कारण आता परत एकदा लॉकडाउन करणे परवडणारे नाही. असे आवाहन शिवसंग्राम पक्षाचे शेवगाव तालुका अध्यक्ष नवनाथराव इसारवडे यांनी केले आहे. ते म्हणाले की, मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढ होत असून, शेवगाव तालुक्यात देखील कोरोना बाधित रुग्ण आढळत आहे.

मागील काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली होती. परंतु कोरोनाच्या बाबतीत नागरिकांमधील भीतीचे वातावरण काहीसे कमी होवून कोरोना संपल्याची भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाल्यामुळे शासनाने दिलेल्या नियमांचा नागरिकांना विसर पडला होता.

त्यामुळे चेहऱ्याला मास्क, सामाजिक अंतर व साबण अथवा हँडसॅनिटायझरने आपले हात वारंवार धुण्याचा देखील नागरिकांना विसर पडला होता. त्या निष्काळजीपणामुळे रोडावलेली कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे नागरिकांनी यापुढे प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी.

यापुढे लॉकडाऊन करणे परवडणारे नाही त्याचे दूरगामी परिणाम होवून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे परिणाम होतात.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe