अहमदनगर ब्रेकिंग : मळण यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-सध्या सर्वत्र सुगीचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असून साकत परिसरातही मोठय़ा प्रमाणावर सुगीचे काम सुरू आहे.

मात्र एकीकडे हे काम सुरु असताना एक दुर्दैवी घटना घडली असून या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

साकत जवळील कोल्हेवाडी येथील सिंधुबाई बजरंग कोल्हे ( वय ४२) या शेतकरी महिलेचे मळण यंत्रात अडकून जागीच निधन झाले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कोल्हेवाडी येथे बजरंग कोल्हे यांच्या शेतात ज्वारीचे खळे सुरू होते. कुटुंबातील लोक मळण यंत्रावर काम करत होते.

खळे संपत आले असताना मळण यंत्राखाली पडलेले भुसकट काढण्यासाठी सिंधुबाई कोल्हे या वाकून भुसकट काढत होत्या.

त्यावेळी ट्रॅक्टर व मळण यंत्र ज्या ठिकाणी जोडले जाते त्या शाप्टमध्ये सिंधुबाई यांच्या साडीचा पदर अडकला व शाप्टसोबत

त्यांच्या शरीराचा भागही गुंतला डोके ही मळणी यंत्रात अडकले काही समजण्याच्या आत ही दुर्घटना घडली. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सिंधुबाई कोल्हे यांच्या मागे पती, दोन मुले, सुन व नातवंडे असा परिवार आहे. हि घटना समजताच साकत व कोल्हेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe