अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-नगर – महाविद्यालयीन जीवनात एन.एस.एस. मधील योगदानामुळे सामाजिक भान येते. याबरोबर नेतृत्व विकसित होते.
इतरांसाठी जगण्याची भावना तयार होते. युवा वर्गाला आपल्या कलागुणांसाठी व्यासपीठ मिळत असते. या अंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात, त्यामुळे विद्यार्थी समाजाभिमुख होतो.
आज प्रत्येक नागरिकाने कोरोना व वाहतुक नियमावलीनुसार वर्तन करणे समाजहितासाठी आवश्यक आहे. हे नियम आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी आहेत हे प्रत्येकाने जाणले पाहिजे, असे प्रतिपादन रजिस्ट्रार ए.वाय. बळीद यांनी केले.
अहमदनगर महाविद्यालयील राष्ट्रीय सेवा योजना आयोजित कोरोना व वाहतुक नियम जागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री. बळीद बोलत होते. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमांतर्गत स्वयंसेवकांनी अहमदनगर महाविद्यालय, पत्रकार चौक, झोपडी कॅन्टीन या ठिकणी मास्क वितरित केले. तसेच मास्क व हेल्मेट घातलेल्यांचे शहर वाहतुक शाखेचे पो.उपनिरिक्षक विकास देवरे यांच्या उपस्थितीत गुलाब पुष्प देवून स्वागत केले.
यावेळी अहमदनगर उपकेंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संचालक डॉ.एन.आर.सोमवंशी, उपप्राचार्य प्रो. डॉ.बी. एम. गायकर, उपप्राचार्य प्रो.डॉ. ए.व्ही. नागवडे, ईटीआय संचालक डॉ.शरद बोरुडे उपस्थित होते.
यावेळी पोलिस प्रशासनातील पी.एन.दत्ता मोरे, ए.एस.आय.सय्यद, एच.पी.गवळी, टी.सी.ससे, एच.सी.पालवे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संयोजन कार्यक्रम अधिकारी प्रा.अशोक घोरपडे व कार्यक्रम अधिकारी डॉ.मालती येवला यांनी केले.
प्रा.फरहान शेख यांनी हकार्य केले. या उपक्रमात एनएसएस स्वयंसेवक गणेश टोगे, निलेश फसले, प्रज्वल वहाडणे, विशाखा पोखरकर, फिरदोस सय्यद, हर्षल कासार, स्नेहल बागडी, शीतल दहिफळे, वैभव अनारसे, अंकित भाटिया यांनी सहभाग घेतला.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|