अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-पाथर्डी तालुक्यातील करडवाडी शिवारात वांबोरी पाईप चारीची मुख्य पाईपलाईन फोडल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे तिसगाव पाझर तलावात सुरु असलेला पाणीपुरवठा खंडित झाला.
याप्रकरणी शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि,पाईपचारीला गेल्या हप्त्यात ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या आदेशाने पाणी सुरु झाले. चार दिवसांतच ते शिरापूरच्या अंतिम भागांत पोहोचले.
मात्र अज्ञात व्यक्तींने सोमवारी मध्यरात्री करडवाडी शिवारात पाईपलाईन फोडली. त्यामुळे पुन्हा व्यत्यय आला आहे.कालवा निरीक्षक पांडुरंग आरगडे,
बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर शाखा अभियंता आंधळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत,
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|