नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई सुरूच

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतर कोरोना ग्रस्तांच्या संख्येत सतत वाढत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांसमोर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भर पडत असतानाच ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

नुकतेच अकोले तालुक्यात लग्न, जागरण गोंधळ समारंभात गर्दी केली म्हणून रूंभोडी, इंदोरीत दोन विवाह सोहळ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. यावेळी पोलिसांनी दहा हजार रुपये दंड वसूल केला.

गेली आठ-दहा दिवसात विनामास्क व्यक्तींविरुद्ध शंभर रुपये दंडाच्या नगरपंचायत प्रशासनाने २५१ तर पोलिसांनी २८६ कारवाया केल्या. लग्नात ५० पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्याने दोन ठिकाणी कारवाया,

करून प्रत्येकी दहा हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. अकोले शहरातील एका पावभाजी सेंटरवरही कारवाई करण्यात आली. हॉटेल चालकास अडीच हजार रुपये भुर्दंड सोसावा लागला.

ऑक्टोबर २०२० या महिन्यात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली होती. त्यानंतरच्या महिन्यात कोरोनाची स्थिती हाताबाहेर नव्हती. परंतु आता कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून कोरोना नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe