शेतीच्या वादातून तिघांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- नेवासा तालुक्यातील पिंप्री शहाली शेतीच्या बांधाच्या वादातून तलवार, चाकू व लाकडी दांडक्याने मारहाण करुन चौघा जणांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत संगिता ताराचंद नवथर (वय 50) रा. पिंप्रीशहाली ता. नेवासा यांनी फिर्याद दिली आहे.

त्यांच्या फिर्यादीवरून तिघांवर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादीने फिर्यादीत म्हंटले आहे कि, 26 फेब्रुवारी रोजी मी तसेच माझे सासू सासरे व दिर-जाऊ व दोन्ही मुले असे घरी असताना तेथे अचानक संदीप भाऊसाहेब गवारे, रंजना भाऊसाहेब गवारे, भाऊसाहेब लक्ष्मण गवारे (सर्व रा. पिंप्रीशहाली) हे आले.

यावेळी शेतीच्या वादातून बाचाबाची झाली यावेळी आरोपी संदीप भाऊसाहेब गवारे याने त्याच्या हातातील तलवारीने माझ्यावर दोन वार केले. त्यात मी गंभीर जखमी झाले. माझा मुलगा प्रदीप, दिर सुभाष हरिश्‍चंद्र नवथर हे मला वाचवण्यासाठी आले असता त्यांना रंजना भाऊसाहेब गवारे हिने हातातील चाकूसारख्या हत्याराने मारुन जखमी केले.

भाऊसाहेब लक्ष्मण गवारे यांने माझा दुसरा मुलगा दिपक नवथर यास लाकडी दांडक्याने डाव्या पायाच्या पंजावर मारुन व शिवीगाळ करुन आपसात संगनमत करुन जिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न करुन गंभीर जखमी केले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी वरील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe