धक्कादायक ! कोरोनाची लस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे संक्रमण वाढू लागले आहे. यामुळे नागरिकांनी स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासन करत आहे.

मात्र नागरिकांच्या संरक्षणासाठी 24 तास अलर्ट राहणारे पोलीस कर्मचारीच या विषाणूंच्या विळख्यात येत आहे. नुकतेच अशीच एका घटना जिल्ह्यतील श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.

श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्यातील पाच पोलिस कर्मचारी व एक अधिकारी कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. विशेष म्हणजे या सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर त्यांना कोरोनाचा सामना करावा लागला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, काही दिवसापूर्वी बेलवंडी पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना त्रास जाणवला. कोरोना चाचणी केल्या त्यात पाच कर्मचारी व अधिकारी पॉझिटिव्ह आले.

यात एक महिला कर्मचारी आहे. मात्र सगळ्यांची प्रकृती चांगली असून हे सगळे कर्मचारी त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान लस घेतल्यानंतरही ते कोरोना बाधित कसे झाले यावर डॉ. खामकर म्हणाले, लस घेतल्यानंतर सुमारे १५ ते २० दिवस गेल्यावर त्या लसीचा परिणाम दिसून येतो.

मात्र लस घेतल्यानंतर पहिल्याच आठवड्यात हे पोलिस कर्मचारी बाधित आढळले आहेत. त्यामुळे लस घेण्याचा त्यांच्यावर परिणाम होण्याअगोदरच कोरोना पॉझिटिव्ह आले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe