अहमदनगर जिल्ह्यात फॅमिली डॉक्टरने एकतर्फी प्रेमातून केल असे काही..

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- संगमनेरात बागवानपुरा परिसरात राहणार्‍या एका फॅमिली डॉक्टरने त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णाशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, जेव्हा संबंधित महिलेने डॉॅक्टरला समजून सांगत घर गाठले तेव्हा मात्र या महाशयाने थेट पाटलाग करुन रुग्णाच्या घराभोवती घिरट्या घालण्यास सुरूवात केली.

हा सर्व प्रकार पीडित महिलेच्या घरी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरॉत कैद झाला तेव्हा या डॉक्टरने तो कॅमेरा दगडाने फोडला. हा प्रकार येथेच थांबला नाही. तर, चक्क डॉक्टरने बुरखा घालुन घरासमोर येणे-जाणे कामय ठेवले.

तरी देखील त्याचे मन समाधान झाले नाही. अखेर त्याने दि. 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास संबंधित महिलेचा हात धरीत त्याच्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली.

मात्र, झाले काही वेगळेच.घरंदाच महिलेने कोणत्याही प्रकारची भिडभाड न ठेवता थेट घडला प्रकार आपल्या पतीस सांगितला आणि नंतर डॉ. इरफान अली शब्बीर असी शेख याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe