अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवक ठार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले.

रविवारी सायंकाळी संगमनेर- कोपरगाव रस्त्यावर ही घटना घडली. या बाबत अधिक माहिती अशी, संगमनेर ते कोपरगाव रस्त्याने गोकुळ राजेंद्र माळी (वय २१) व आशुतोष नानासाहेब बोरसे (वय २२ वर्ष, दोघेही रा. लोणी) हे दोघे युवक दुचाकीवरून (क्र. एमएच १७ सीके ९१८६) कोपरगावकडून तळेगाव दिघेच्या दिशेने प्रवास करीत होते.

दरम्यान कोपरगावच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. झालेल्या भीषण अपघात दोघेही जागीच ठार झाले. अपघातास कारणीभूत अज्ञात वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला.

अज्ञात वाहन आयशर टेम्पो होते, त्याचा क्रमांक काही युवकांनी लिहून घेतला आहे. घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथे हलविले.

संगमनेर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबा खेडकर यांनी अपघातास कारणीभूत वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe