अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- जर राठोड दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होणारच, ही सरकारची भूमिका कायम आहे. परंतु सध्या संजय राठोड याच्या राजीनामा मुद्यावरुन गलिच्छ राजकारण केले गेले आहे.
या प्रकरणाची पूर्णपणे निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठीच त्यांचा राजीनामा घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आमची जबाबदारी न्यायाने वागण्याची आहे. या प्रकरणात तपास झाला पाहिजे, तो निष्पक्ष झाला पाहिजे. कोणीही असो दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका आहे.
राठोड यांच्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषेदत सरकारची भूमिका स्पष्ट केली. गेल्या आठवड्यात आणखी एक आत्महत्या मुंबईत झाली त्याची कोण चर्चा करत नाही. त्या आत्महत्येत सुसाईड नोट आहे, त्यात काही बड्या नेत्यांची नावे आहेत.
भाजपच्या नेत्याचे नाव असतील तर त्यांना तसा छळ करण्याचा परवाना भाजपच्या नेत्यांनी दिला आहे का, असा सवाल देखील मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. संजय राठोड प्रकरणी पोहरा येथे ज्यांनी शक्तिप्रदर्शन केले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पूजा चव्हाण प्रकरणातून संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला.
संजय राठोड यांनी पत्नीसह वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे राजीनामा सोपवला. या भेटीनंतर राठोड यांनी माध्यमांसमोर येत राजीनामा देण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण राठोड यांना भोवल्याने राजीनामा द्यावा लागला.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|