सतर्क नागरिकांमुळे जादूटोण्याचा प्रकार उघडकीस

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  एकीकडे देशाची वाटचाल आधुनिकतेकडे चालली आहे तर दुसरीकडे आजही ग्रामीण भागात जादूटोणा, बुवाबाजी, मांत्रिक हे आपली काळीजादु दाखवण्याचा धंदा चालूच ठेवताना दिसून येत आहे.

एकीकडे या घटना सुरूच आहे, मात्र आजही काही सज्ञान नागरिकांमुळे अशा प्रकरण आळा घातला जातो आहे. दरम्यान नुकतेच अशीच घटना राहुरी फॅक्टरी येथे घडली आहे.

राहुरी फॅक्टरी ते ताहाराबाद रोडवरील एका सुशिक्षित कॉलनीतील एका घरात नवरा व बायको दांडी पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास म्हसनी उद, लिंबू व अन्य वस्तूंच्या सहाय्याने राहुरी येथील मांत्रिक महिला, चिंचविहीरे येथील मांत्रिक पुरुष तसेच पाथर्डी येथील एक मांत्रिक महिला यांच्यामार्फत जादूटोणा करीत असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले.

घरातून धूर बाहेर येत असल्याचे तरुणांना दिसले. त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात याची माहिती पोहच झाली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जादूटोणा सुरू असलेल्या घरात पोलसांनी प्रवेश करत सर्व तपासणी केली असता त्यांना लिंबू, मिरची व इतर वस्तू आढळून आल्या.

त्यानंतर पोलिसांनी घरात उपस्थित मांत्रिकाने चांगलाच खाक्या दाखविला असता त्यांनी घरात सुरु असलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी सर्वांची नावे व पत्ता पोलिसांनी लिहून घेऊन सर्व माहिती पोलीस निरीक्षक गाडे यांना भ्रमणध्वनीद्वारे पोलीस कॉन्स्टेबल मोराळे यांनी दिली.

त्यानुसार सर्व मांत्रिक व ज्यांच्या घरात जादूटोणा सुरू होता, अशा एकूण 5 जणांना राहुरी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News