हल्ली विविध मणके विकार वाढत चालले आहे. यातील कित्येक समस्यांना आपण डोळे झाक करत पुढे जातो. मात्र अशा पद्धतीने केलेले दुर्लक्ष भविष्यात एका मोठ्या आजाराकडे घेऊन जात असते. याबद्दल आपण फारसा विचार करत नाही.
जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा कुठे आपल्याला डॉक्टर आठवतात. मग एक- एक प्रश्न सुरु होतात. डॉक्टर माझी मान खूप दुखते, कधी-कधी एका हाताला मुंग्या सुद्धा येतात, हात थरथर कापतात, चक्कर येते इत्यादी हा काय प्रकार आहे? हा पूर्ण पणे बरा होतो का? मणक्याच्या हाडाचा काही विकार असेल का? असे 5-10 प्रश्न रुग्ण एकदमच विचारून तो मोकळा होतो.
फक्त प्रश्न विचारून तुमचे समाधान होणार नाही. त्यासाठी त्याबाबत अधिक माहिती असायला हवे. मानेमधे 7 प्रकारचे मनके असतात C1 To C7. त्याच्या प्रत्येक मणक्यामधून दोन्ही बाजूला 2 Nerve जातात – बाहेर पडत असतात. त्या Nerve हातापायाला संवेदना देणे व त्यांच्या संवेदना घेवून जाणे या क्रिया करत असतात.
मानेच्या मणक्याची झीज झाल्यामुळे त्यांच्यामध्ये असणाऱ्या गादी (Disc) ची झीज होऊन ती फाटते किंवा बाहेर सरकते (Slip Disc) त्याचा उलट परिणाम मणक्यातील अंतर कमी होते व त्यामधून जाणाऱ्या शिरांवर दाब येतो त्या दाबल्या जातात. त्यामुळे हाताला येणाऱ्या संवेदना कमी होतात व हाताला मुंग्या येतात. संवेदना कमी, रक्तप्रवाह कमी, हाताचे पोषण कमी त्यामुळे हाताची ताकदही कमी होवू लागते. आता हे झाले समस्येचे मूळ कारण. मात्र उपाय काय?
अहमदनगरमधील प्रसिद्ध मणके विकार तज्ज्ञ डॉ. रवींद्र नरवडे यांनी अवघ्या तीन महिन्यात शुद्ध आयुर्वेदिक औषधांनी आणि पंचकर्मानी हजारो रुग्णांना विविध मणके विकारांवर खात्रीशीर मुक्ती मिळवून दिली आहे.
डॉ. नरवडे सांगतात, ज्या दोषाचा रोग आहे ते कर्म सर्वप्रथम करावे व नंतर काळानुसार इतर पंचकर्म करावे. आपल्या मणक्याच्या समस्येच्या मुळाशी एकदा जा. म्हणजे नक्की काय उपचार करायला हवे? ते कळेल. तसेच काही सुचत नसेल तर डॉक्टरांना भेटूनच अडचणी दूर करा. आपल्या मनाला वाटेल तसे किंवा कुणी सांगेल त्या पद्धतीने उपचार करू नका.
तज्ज्ञ डॉ. नरवडे यांना आपण सत्यम शिवम सुंदरम, शिवम प्लॅट नं. 104, पोलिस क्वॉर्टरच्यासमोर, बालिकाश्रम रोड किंवा विद्या कॉलनी, आदर्शनगर, कल्याणरोड, अहमदनगर येथे भेट देऊ शकता व आपल्या विविध समस्यांवर खात्रीशीररित्या मात करू शकता. संपर्क : 9422736300 I 9403848382 ईमेल : [email protected]