अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- निर्दोष सुटल्यानंतर मिरवणूक काढणे कुख्यात गुंड गजा मारणे याला आता चांगलेच महागात पडणार आहे. कारण पिंपरी चिंचवड पोलिसांनी गजा मारणे आणि त्याच्या साथिदारांवर खंडणी आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे तसेच, त्यापूर्वीच्या फूड मॉलवर जबरदस्तीने वस्तू घेतल्याचा ठपका गजा मारणेवर ठेवण्यात आला आहे. तसेच गजा मारणे याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारावाई केली जाईल असेही पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांनी सांगितले.
पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास ३०० गाड्या होत्या.
त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमेराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. तसेच उर्से टोल नाक्यावर गजा भरणे याने टोल न भरणे तसेच आधीच्या दुकानातून जबरदस्तीने त्याच्या साथीदाराने सामान घेतले होते.
तसा आरोप गजा मारणे आणि त्याच्या साथिदारांवर ठेवण्यात आला आहे. यावेळी या मिरवणुकीत तब्बल तीनशे गाड्या होत्या. तसेच जो ज्या गाडीत बसलेला होता, त्या गाडीची किंमत तब्बल दोन कोटी होती.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|