अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-गॅसची वाढ दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. फेब्रुवारी महिन्यातच सलग ३ वेळा ही वाढ झाली आहे.
त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गृहिणींना संसाराचा गाडा चालवणे अवघड झाले आहे. मोदींच्या केंद्र सरकारला अजिबात जनतेविषयी सहानुभूती नाही.
त्यामुळे अखेर चूल मांडा आंदोलनाशिवाय आणि चूल मांडण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. त्यातच भर म्हणजे पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी हिवाळ्यामुळे ही वाढ झाल्याचा अजब दावा केला आहे. त्यामुळे संतापाची अधिकच भर पडली आहे.
त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्य्क्षा रेश्मा आठरे यांच्या नेतृत्वाखाली मोदींच्या पेट्रोलपंपावरील बॅनरखाली चूल मांडा आंदोलन करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.
या महिन्यात सर्वप्रथम ४ फेब्रुवारी २०२१ रोजी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी पुन्हा ५० रुपयांची वाढ करण्यात आली. मग आता तिसऱ्यांदा एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली आहे.
नव्या दरवाढीमुळे आता १४.२ किलोग्रॅम एलपीजी गॅस खरेदीसाठी ग्राहकांना ७६९ रुपये मोजावे लागणार आहेत जे ३ फेब्रुवारी रोजी ७९४ रुपये इतके होते. मुंबईत एलपीजी गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना ७९४ रुपये मोजावे लागणार आहेत.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|