अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-चायनीज नॅशनल ब्यूरो ऑफ स्टॅटिक्सने चिनी राष्ट्रीय आर्थिक सामाजिक विकास सांख्यिकीय प्रकाशन 2020 मध्ये 28 फेब्रुवारी रोजी जाहीर केले ज्यामध्ये असे दिसून आले आहे की गेल्या वर्षाच्या अखेरीस चीनमधील इंटरनेट वापरण्याची संख्या 98.9 करोड़वर पोचली आहे व मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या 98.6 कोटी आहे.
आकडेवारीनुसार, सन 2020 मध्ये एकूण 1 खरब 65 अरब 60 करोड़ (1,65,600,000,000) GB फोन डेटा वापरला गेला, जो सन 2019 च्या तुलनेत 35.7 टक्क्यांनी वाढला आहे. या व्यतिरिक्त, संपूर्ण वर्षात 83 अब्ज 36 कोटी एक्सप्रेस डिलीवरी सेवा पूर्ण झाल्या आहेत.
नागरिकांच्या उत्पन्नाविषयी आणि त्यांच्या वापराविषयी अहवालात असे दिसून आले आहे की सन 2020 मध्ये देशभरातील नागरिकांचे सरासरी डिस्पोजेबल उत्पन्न 27 हजार 540 युआन होते, जे मागील वर्षाच्या तुलनेत 3.8 टक्के जास्त आहे. यात शहरे व शहरांमधील नागरिकांचे सरासरी डिस्पोजेबल उत्पन्न 40 हजार 378 युआन होते,
जे 2.9 टक्क्यांनी वाढले आहे. त्याच वेळी ग्रामीण नागरिकांचे सरासरी डिस्पोजेबल उत्पन्न 15 हजार 204 युआन होते, ते 5.7 टक्क्यांनी वाढले आहे. आकडेवारीनुसार, सन 2020 मध्ये चीनमधील नागरिकांचा सरासरी वापर खर्च (कंजम्पशन एक्सपेंडीचर) 21 हजार 210 युआन होता, जो सन 2019 च्या तुलनेत 1.6 टक्क्यांनी खाली आला आहे.
लोकांनी शॉर्ट व्हिडिओ आणि शॉपिंगमध्ये रस दर्शविला :- चिनी इंटरनेट वापरकर्त्यांनी व्हिडिओ पाहणे आणि शॉपिंग करण्यात सर्वाधिक वेळ घालवला आहे.
लॉकडाऊन दरम्यान ही संख्या लक्षणीय वाढली आणि डिसेंबरमध्ये ही संख्या 76.33 मिलियन वरून 927 मिलियन वर गेली. याचा अर्थ असा आहे की सर्व चिनी इंटरनेट वापरकर्त्यांपैकी 94 टक्के लोकांनी ऑनलाइन व्हिडिओ पाहिले आणि 79 टक्के लोकांनी ऑनलाइन शॉपिंग केली.
त्याशिवाय मार्चमध्ये शॉर्ट व्हिडिओ यूजर्सची संख्या 100 मिलियन होती जी वर्षाच्या अखेरीस 873 मिलियन वर पोचली. त्याच वेळी, मार्चमध्ये लाइवस्ट्रीमिंग ई-कॉमर्सचे यूजर्स देखील 123 मिलियन होते, जे डिसेंबरमध्ये वाढून 388 मिलियन झाले आहेत. यातील दोन तृतीयांश लोकांनी लाइव स्ट्रीम पाहत खरेदी केली.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|