अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-भरधाव वेगातील टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. नगर तालुक्यातील हिवरे बाजार गावातील सब स्टेशनच्या पाठीमागे ही घटना घडली.
संदीप किसन मुठे (रा.भोयरे खुर्द ता.नगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर किरण भागचंद जाधव (रा.निमगाव वाघा ता.नगर) हे जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर असे की,
नगर तालुक्यातील हिवरे बाजार येथील वीजवितरण कंपनीच्या सबस्टेशनच्या पाठीमागे विरूध्द बाजूने भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.
यात मोटारसायकलवरील संदीप किसन मुठे यांचा मृत्यू झाला तर किरण भागचंद जाधव (रा.निमगाव वाघा ता.नगर) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी टेम्पो (एमएच १६ एवाय १०४७) चालक संजय पोपट ढगे (रा. पिंपळगाव वाघा ता.नगर)
याच्याविरूद्ध नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पांडूरंग किसन मुठे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास महिला पोलीस नाईक गायकवाड करीत आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|