पारनेर :- सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचवण्यासाठी विधानसभेत अभ्यासपूर्ण कामगिरी करण्याचा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवनिर्वाचित आमदार नीलेश लंके यांना दिला.
राज्यातील निकाल पाहता मतदार जागा झाल्याचे दिसून आले. हे निकोप व सदृढ लोकशाहीचे लक्षण असल्याचे हजारे यांनी यावेळी सांगितले.


विजय संपादन केल्यानंतर लंके यांनी राळेगणसिद्धीत जाऊन हजारे यांचे आशीर्वाद घेतले. हजारे यांनी त्यांचे अभिनंदन करून पाण्याच्या प्रश्नावर काम करण्याचा निर्धार तडीस न्या, असे बजावले.
येत्या दोन-तीन दिवसांत तालुक्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
हजारे म्हणाले, प्रमुख चार पक्षांना मतदान करताना सत्ताधारी व विरोधी पक्ष असा समतोल मतदारांनी राखला. युती व आघाडीच्या उमेदवारांना मतदान करताना सत्ताधारी व विरोधी पक्ष जिवंत ठेवण्याचे काम मतदारांनी केले.
दरम्यान, विकासाभिमुख भूमिका घेत तालुक्याचा विकास वेगाने करण्याची ग्वाही नवनिर्वाचित आमदार नीलेश लंके यांनी दिली.
गांजीभोयरे गावाच्या वतीने लंके यांचा सरपंच डॉ. आबासाहेब खोडदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी या वेळी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
- लाडक्या बहिणींसाठी Good News ! सप्टेंबर महिन्याचा हप्ता ‘या’ मुहूर्तावर खात्यात जमा होणार, वाचा डिटेल्स
- मोठी बातमी ! लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवाभाऊंची मोठी घोषणा, आता महिलांना मिळणार बिनव्याजी 100000 रुपयांचे कर्ज
- वाईट काळ कायमचा निघून जाणार! ऑक्टोबर महिन्यात ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होईल, मनातील अनेक इच्छा पूर्ण होणार
- राज्य शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात मिळणार चार दिवसांची शासकीय सुट्टी !
- शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शाळांना 20 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत सलग सुट्टी जाहीर, दिवाळीच्या आधीच सरकारची मोठी घोषणा