शहराचा चेहरामोहरा बदलू : जगताप

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-  विकासकामांतून शहराचा चेहरामोहरा बदलायचा आहे. यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. गुलमोहर रोड आणि पाइपलाइनच्या विकासकामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल.

नगरसेवकांनी प्रभागाच्या विकासकामासाठी विकास आराखडा तयार करून विकासकामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावावीत. जमिनीअंतर्गत कामे सध्या शहरात सुरु आहेत. ती कामे मार्गी लागल्यानंतर शहरातील रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहे.

प्रभाग क्र. ४ मध्ये नगरसेविका ज्योती गाडे यांच्या प्रयत्नातून मेघराज कॉलनी येथे बंद पाईप गटार कामाचा शुभारंभप्रसंगी आमदार संग्राम जगताप बोलत होते.

प्रभाग क्र. ४ मध्ये नगरसेविका गाडे यांच्या प्रयत्नातून मेघराज कॉलनी येथे बंद पाइप गटार कामाचा शुभारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते झाले.

यावेळी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, स्वप्निल शिंदे, अमोल गाडे, सुमित कुलकर्णी, नितीन शिंदे, मिलिंद गाणार, राजेंद्र वाघोले, अनिल जोशी, शिवाजी डोके आदी उपस्थित होते.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News