अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- जिल्हा बॅकेच्या सोनई शाखेतील सेवानिवृत्त कर्मचारी सुधाकर यशवंत वाघ (वय ६१) हे सोनई-राहुरी रस्त्यावरील सेवा संस्थेच्या व्यावसायिक शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर सायकलसह उभे असताना त्यांना अज्ञात रिक्षाने मागून धडक दिल्याने गंभीर जखमी झाले.
नगर येथे खासगी रुग्णालयात उपचार घेताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|