महसूल मंत्र्यांचा तालुका बनतोय अवैध धंद्यांचा ‘हॉटस्पॉट’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- अवैध धंदे, जुगार , गुटखा तस्करी, कत्तलखाने या विविध प्रकरणाने चर्चेत असलेला संगमनेर तालुका पुन्हा एकदा शहरात सुरु असलेल्या भिशी च्या व्यवसायामुळे चर्चेत आला आहे.

नुकतेच हे भिशीच्या प्रकरणांमुळे एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. संगमनेर तालुक्यात भिशीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. मोठा आर्थिक फायदा होत असल्याने अनेकजण भिशी चालवित आहेत.

शहरातील आजी-माजी नगरसेवकांचाही यात समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून हा व्यवसाय अडचणीत येत आहे. भिशीत गुंतविलेले पैसे मिळत नसल्याने शहरातील सय्यदबाबा चौकातील एका भिशीचालकाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्याने 14 जणांना जबाबदार धरले होते.

ही घटना ताजी असतानाच एका विद्यमान नगरसेवकाची भिशी सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान शहरातील एका नगरसेवकाकडे भिशीचे दोन कोटी रुपये अडकले आहेत. त्याने वर हात केल्याने भिशीत सहभागी असणारे त्रस्त झाले आहेत.

या नगरसेवकाच्या हाताखाली काम करणार्‍या भिशीचालकांनीही पैसे देण्यास टाळाटाळ चालविल्याने अनेकांनी त्यांच्याकडे तगादा लावला आहे. हे पैसे न मिळाल्यास शहरात उद्रेक होण्याची शक्यता आहे. पोलीस व संबंधित खात्याने शहरातील अवैध भिशी व्यवसायाबाबत कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe