अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- एटीएम कार्डची चोरी करून 18 हजार रुपयांची रक्कम काढलेल्या आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली. आदिनाथ रावसाहेब कार्ले (वय 24, रा. चास ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि , बाळासाहेब गावखरे (रा. भिंगार) यांचे एसबीआयचे एटीएम कार्ड अज्ञात चोरट्याने चोरून त्याद्वारे 18 हजार रुपयांची रक्कम काढली होती.

file photo
याप्रकरणी विजया बाळासाहेब गावखरे यांनी भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दरम्यान याप्रकरणाची पोलिसांनी एसबीआय बँकेतून माहिती घेत आरोपीची माहिती काढली.
माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. कार्ले याने गुन्ह्याची कबुली देत एटीएममधून काढलेली रक्कम काढून दिली. शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार पोलिसांनी ही कारवाई केली.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|