विनामास्क बाजारात गेले अन पावती फाडून माघारी आले!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:-  नगर शहरासह अनेक तालुक्यात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता. श्रीगोंदा पोलीसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईला सुरवात केली आहे.

यात सलग दोन दिवस सुमारे २०० जणांवर कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक अंमलबजावणी करण्याचे महसूल आणि पोलीस प्रशासनाला निर्देश देत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर तब्बल ५०० रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

तालुक्यातील काष्ठी येथील आठवडे बाजारात पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या ११२ जणांवर कारवाई केली. त्यानंतर श्रीगोंदा येथील आठवडे बाजारात पुन्हा तब्बल ८७ जणांवर दंडात्मक कारवाई केली. आता मात्र पोलिसांच्या या धडक कारवाईचा चांगलाच धसका घेतला आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe